नवी दिल्ली – भारतीय बॉक्सिंगजगतावर शोककळा पसरल्याची बातमी समोर आली आहे. माजी ऑलिम्पिक बॉक्सिंगपटू शक्ती मजूमदार यांची आज प्राणज्योत मालावली आहे. मजूमदार यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यामध्ये त्यांचे निधन झाले आहे. ते ८९ वर्षाचे होते. १९५२ साली झालेल्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता.
शक्ती मजूमदार हे मागील काही काळापासून वयाशी संबंधित आजारांनी ग्रासले होते. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाची बामती कळताच बेंगाल इमेच्योर बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष असित बॅनर्जी म्हणाले “आम्हाला हे सांगताना अतिशय वाईट वाटत आहे की, शक्ती मजूमदार यांनी आज पश्चिम बंगाल येथील बालीगंज येथे अखेचरा श्वास घेतला आहे.”