मुंबई – हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ‘अँजेलिना जोली’ तिच्या ग्लॅमर्स आणि मादक सौंदर्यासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. अँजेलिना जोलीचे जगभरात कोट्यवधी फॅन्स असून, ते तिच्यावर अक्षरशः जीव ओवळतात.
अँजेलिना प्रत्येक वेळी हटके फोटोशूट करून चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. तिचे हे फोटो पाहून चाहतेही अँजेलिनाचं कौतुक केल्यावाचून राहू शकत नाहीत. यावेळेस मात्र तिच्या एका फोटो शूट मुळे चाहत्यांना चक्रावून टाकलं आहे.
नुकतंच अँजेलिना जोलीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जवळपास एक हजार मधमाशा अँजेलिनाच्या कपड्यांवर आहेत. तिचा गळा, खांदे आणि तोंडावरही या मधमाशा पाहायला मिळत आहेत. तीच हे धाडस फॅन्सला अक्षरशः चक्रावून टाकणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अँजेलिनाने हे फोटोशूट आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस साजरा करण्यासाठी केलं आहे. या मधमाशा डैन विन्टर्स यांच्या पाळीव मधमाशा आहेत. या फोटोमध्ये जवळपास 18 मिनिटं या मधमाशा अँजेलिनाच्या अंगावर होत्या. असं डैन विन्टर्स म्हणतात. तसेच या मधमाशा शांत राहाव्यात आणि त्यांनी अँजेलिनाला कोणत्याही प्रकारची हानी करू नये, यासाठी विशेष लक्ष दिलं गेलं होतं.
View this post on Instagram
सध्या अँजेलिना जोलीचं हे अनोखं फोटो शूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. अनेकांनी तिच्या या धाडसाचं कौतुक केलं तर, काहींनी तिची थट्टा उडवत अँजेलिनाला ट्रोल केलं आहे. आतापर्यंत क्वचितच एखाद्या अभिनेत्रीनं या प्रकारचं धाडस केलं असावं.