नवी दिल्ली : बीसीसीआयने पुरूष क्रिकेटपटूसोबत महिला क्रिकेटपटूची सुध्दा मध्यवर्ती कराराची यादी जाहीर केली आहे. यात स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, पूनम यादव यांना ‘अ’ श्रेणीत स्थान मिळाले आहे. तर नवोदित १५ वर्षीय खेळाडू शफाली वर्मा हिचा क श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.
BCCI announces annual player retainership 2019-20 – Team India (Senior Women)
Full details here –https://t.co/QP9Y6QPWfP pic.twitter.com/9iZCCDexYV
— BCCI Women (@BCCIWomen) January 16, 2020
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आणि एकदिवसीय सामन्याची कर्णधार मिथाली राज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी यांना ‘ब’ श्रेणीत स्थान मिळाले आहे. महिला करारात ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंना ५० लाख, ‘ब’ श्रेणीतील खेळाडूंना ३० लाख तर ‘क’ श्रेणीतील खेळाडूंना १० लाख रूपये मानधन मिळणार आहे.
करारबध्द महिला खेळाडू खालीलप्रमाणे :
‘अ’ श्रेणी (५० लाख) : हरमनप्रीत कौर, स्मृति मंधाना, पूनम यादव.
‘ब’श्रेणी (३० लाख) : मिताली राज, झूलन गोस्वामी, एकता बिष्ट, राधा यादव, तानिया भाटिया, शिखा पांडे, जेमिमा रोड्रिग्ज, दीप्ति शर्मा
‘क’ श्रेणी (१० लाख) : वेदा कृष्णमूर्ति, पूनम राउत, अनुजा पाटिल, मानसी जोशी, डी हेमलता, अरुंधित रेड्डी, राजेश्वरी गायकवाड़, पूजा वस्त्रकार, हरलीन देओल, प्रिया पुनिया, शेफाली वर्मा.