हजारीबाग (झारखंड) : हजारीबाग येथील पद्ममधील झारखंड सशस्त्र दलात विषबाधा झाल्यामुळे 40 जवानांना रूग्णालात दाखल करण्यात आले.
गुरूवारी रात्री जेवण झाल्यानंतर या जवानांना त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना हजारीबाग वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्रावर एक हजार 130 हवालदार प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण झाल्यावर या जवानांना सहाय्यक उपनिरीक्षकाचा दर्जा देण्यात येणार आहे.
या जवनांनी जेवण झाल्यावर उलट्या आणि पोटातील वेदनांचा त्रास होऊ लागला. दरम्यान, स्वयंपाकाच्या भांड्यात एक मेलेली पाल सापडली. रूग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे, असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
या पोलिसांना प्रशिक्षण केंद्रात स्वच्छ आणि योग्य आहार मिळत नसल्याची तक्रार पोलिस असोसिएशनने केली आहे.