IT Cup Cricket Championship 2024 – अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित १८ व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस या संघांनी अनुक्रमे केपीआयटी व व्हेरीटास या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात सूरज गुप्ता (४१ धावा व १-१४) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर इन्फोसिस संघाने व्हेरीटास संघाचा ३१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इन्फोसिस संघाने २० षटकात ७ बाद १४५ धावा केल्या. यात सूरज गुप्ता ४१, हर्षद तिडके २५, नीलेश उगिले नाबाद २९ यांनी धावा केल्या.
IPL : ‘या’ गोलंदाजाने टाकली होती आयपीएलची पहिली Super Over, आज ‘तो’ जगत आहे अज्ञाताचे जीवन….
याच्या उत्तरात व्हेरीटास संघ २० षटकात ९ बाद ११४ धावाच करू शकला. यात प्रणव पवार ३५, बरन कुट्टी ३४ यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. इन्फोसिसकडून संदिप संघाय (२-२०), हर्षद तिडके (२-२२), हर्षल महाले (२-२२), सूरज गुप्ता १-१४) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला ३१ धावांनी विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात विक्रांत बांगर (१४ धावा व ३-२१) याने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाने केपीआयटी संघाचा १३ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली.