बास्केटबॉल स्पर्धा : सरदार दस्तुर, कमल नयन बजाज, मिलेनियम स्कूलची आगेकूच

आठवी संजय महादेवराव निम्हण स्मृती बास्केटबॉल करंडक स्पर्धा

पुणे – मुलींच्या गटात सरदार दस्तुर, कमल नयन बजाज आणि मिलेनियम हायस्कूलच्या संघांनी तर मुलांच्या गटात मिलेनियम स्कूल आणि विद्यांचल अ च्या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत येथे होत असलेल्या आठव्या संजय महादेवराव निम्हण स्मृती बास्केटबॉल करंडक स्पर्धेत आपली विजयी आगेकूच कायम ठेवली.

यावेळी महिलाअ गटातील पहिल्या सामन्यात तन्वी साळवे आणि भुमिका सर्जेच्या खेळाच्या बळावर सरदार दस्तुरच्या संघाने डेक्‍कन जिमखानाच्या क संघाचा 42 विरुद्ध 10 अशा गुण फरकाने पराभव करत आगेकूच केली. यावेळी सरदार दस्तुरच्या तन्वी आणि सायली यांनी प्रत्येकी 12 गुण करत संघाला विजय मिळवून दिला. तर, दुसऱ्या सामन्यात कमल नयन बजाजच्या संघाने आयडीयलचा 26 विरुद्ध 18 गुणांनी एकतर्फी पराभव करत विजयी आगेकूच नोंदवली. यावेळी कमल नयन बजाजच्या तुळजा पाटिलने 6 गुण करत विजयात मोलाचा वाटा उचलला.

आयडीयलच्या अश्‍लेषा नेहरेने 8 गुण करत एकाकी लढत दिली. यावेळी झालेल्या अखेरच्या सामन्यात मिलेनियम स्कूलच्या संघाने ऑर्किडच्या संघाचा 20 विरुद्ध 4 गुणांनी सहज पराभव करत आगेकूच नोंदवली. यावेळी मिलेनियम स्कूलच्या आत्मजा दानीने 9 गुंअ करत सांघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, ऑर्किडच्या प्राची पवारने 4 गुण करत एकाकी लढत दिली.

मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात ओमकार जोशीच्या खेळाच्या बळावर मिलेनियम स्कूलच्या संघाने शिवाजी बास्केटबॉल अकादमीचा 34 विरुद्ध 8 गुणांनी एकतर्फी पराभव करत आगेकूच केली. यावेळी मिलेनियमच्या ओमकार जोशीने 16 गुण करत विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, शिवाजी अकादमीकडून आदित्य घोषणे 4 गुण करत एकाकी लढत दिली.

दुसऱ्या सामन्यात विद्यांचल अ च्या संघाने डी. जी. ब च्या संघाचा पराभव करत आगेकूच केली. यावेळी विद्यांचल अ संघाच्या कुणाल भोसलेने 19 गुण करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर डी. जी. ब संघाच्या यशराज काटकरने 5 गुण करत एकाकी लढत दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.