पुणे – सिमेंटेक संघाने सीएलएसए टेक्नॉलॉजीज संघाचा तर टिएटो संघाने हार्मन संघाचा पराभव करत येथे सुरू असलेल्या सत्य प्रकाश जोशी ग्रुप यांच्या तर्फे 5व्या एसपीजे करंडक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत आगेकुच केली.
व्हेरॉक क्रिकेट मैदान व लेजेंड्स क्रिकेट अकादमी मौदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत निखिल भोगलेच्या अचूक गोलंजीच्या बळावर सिमेंटेक संघाने सीएलएसए टेक्नॉलॉजीज संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सीएलएसए टेक्नॉलॉजीज संघाने 20 षटकात 9 बाद 105 धावा केल्या.
105 धावांचे लक्ष सिमेंटेक संघाने केवळ 12.5 षटकात 3 बाद 108 धावा करून पुर्ण केले. यात पंकज कांबळेने 31, अमित सिंघलने 31 व भारत पल्लोडने नाबाद 22 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. 18 धावांत 4 गडी बाद करणारा निखिल भोगले सामनावीर ठरला.
दुसऱ्या सामन्यात उमेश तोमरच्या बिनचूक गोलंदाजीच्या जोरावर टिएटो संघाने हार्मन संघाचा 72 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सुगम सांगोलेच्या 48 धावांसह टिएटो संघाने 20 षटकात 6 बाद 150 धावा केल्या. 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उमेश तोमर व अनुप यांच्या अचूक गोलंदाजीपुढे हार्मन संघ केवळ 15.4 षटकात सर्वबाद 78 धावांत गारद झाला. 6 धावांत 2 गडी बाद करणारा उमेश तोमर सामनावीर ठरला.
सविस्तर निकाल – साखळी फेरी
सीएलएसए टेक्नॉलॉजीज- 20 षटकांत 9 बाद 105 (भावुक जराठ 21, जतिन मनधनीया 20, निखिल भोगले 4-18, पंकज कांबळे 2-13, सचिन जाधव 1-21, भारत पल्लोड 1-17) पराभूत वि सिमेंटेक- 12.5 षटकांत 3 बाद 108 (पंकज कांबळे 31, अमित सिंघल 31, भारत पल्लोड नाबाद 22, जतिन मानधनीया 1-24, दुर्गेश 1-5, आशिष कुमार सिंग 1-12).
टिएटो- 20 षटकांत 6 बाद 150 (सुगम सांगोले 48, विक्रम माळी 26, प्रशांत दुधाने 22, अंकित जैन नाबाद 20, निशांत खेडालगे 3-19, अभिषेक धनवडे 1-16, शाहरुख कलमानी 1-28, हरेंद्र यादव 1-33) वि.वि हार्मन- 15.4 षटकांत सर्वबाद 78 (योगेश सोनिस 14, अभिषेक धनवडे 14, उमेश तोमर 2-6, अनुप 2-15, अंकित जैन 1-13, विनोद तांबे 1-11, विलास जगताप 1-7). सामनावीर- उमेश तोमर