बारामतीच्या पालख्या वाहणार नाही; जाणकारांचा टोला

पुणे: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त आयोजित मेळाव्यात पंकजा मुंडेंसह अनेक भाजप नेत्यांनी भाजपवरच शरसंधान साधले आहे. तसेच यावेळी बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जाणकार यांनी भाजप बरोबरच राष्ट्रवादीवरही निशाणा साधला आहे.

पंकजच्या भाषणात कायम हिट लिस्टवर असणारे पवार कुटुंबीय आज काहीसे बाजूला पडल्याचे पाहायला मिळाले. त्या ऐवजी भाजपातील नेत्यांवरच जोरदार हल्ला झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु मात्र पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय आणि मानलेले बंधू महादेव जानकर यांनी ‘बारामतीच्या पालख्या वाहणार नाही’ असे म्हणत आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवत पवारांना टोला लगावलाच.

दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एकनाथ खडसेंनी देखील भाजप नेतृत्वावर सडकून टीका केली आहे. ज्यांना मोठं केलं त्यांच्याकडूच त्रास दिला जाईल अशी पॆक्ष नव्हती अशा शब्दात खडसेंनी फाडावीसांचे नाव घेऊन टीका केली. तसेच ज्यांच्या बोटाला धरून मोठा झालो तो आधारवड आज माझ्या सोबत असता तर माझ्यावर अन्याय झाला नसता अशी खंतही खडसेंनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.