बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या एक हजार वर पोहोचली आहे. नव्याने 110 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. बारामतीकरांनी घाबरून न जाता स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी केली आहे.
दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. तसेच जे रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत व जे त्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोणीही घाबरून न जाता आपल्या ठिकाणी क्वारंटाईन व्हावे. क्वारंटाईन असलेल्य सर्वांना प्रशासनामार्फत संपर्क साधला जाईल तसेच पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करण्यात येईल. कोणीही घाबरून जाऊ नये व स्वतःची काळजी घ्यावी.
तसेच लक्षण विरहित रुग्णांनी ॲडमिट होण्यासाठी घाई करू नये. सर्वांना संपर्क साधला जाईल व योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. प्रशासनास सहकार्य करावे. अजूनही काही लोक मास्क वापरत नाहीत त्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे आहे. सर्व कामावर जाणाऱ्या तरुणांनी कामावरून घरी आल्यानंतर आपल्या ज्येष्ठ आई-वडील, आजी-आजोबा यांपासून सुरक्षित अंतरावर राहावे.
वत्यांच्याशी बोलताना घरांमध्ये सुद्धा मास्क वापरावे ज्यामुळे त्यांना होणारा कोरोना प्रादुर्भाव टाळता येईल. असे आवाहन डॉक्टर मनोज कुमरे यांनी केले आहे. बारामती शहर व तालुक्यात नव्याने 110 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 41 जणांना मृत्यू झाला आहे.