राजगुरूनगर (प्रतिनिधी) – राजगुरुनगर शहरात करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी राजे शिवछत्रपती मित्रमंडळाने घरोघरी जाऊन मूर्ती संकलन करीत मूर्ती विसर्जन उपक्रम राबविला त्यास नागरिकानी मोठा प्रतिसाद दिला.
राजगुरूनगर शहरातील वाडा रोड वरील राजे शिवछत्रपती मित्रमंडळ निवडक स्वयंसेवक कार्यकर्त्यांद्वारे शहरातील विविध गृह सोसायटीमध्ये गणेश भक्तांच्या घरोघरी जाऊन मूर्ती दान करण्याचे आवाहन केले त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.
गणेश भक्तांनी कुटुंबासहित विसर्जन स्थळी येऊन गर्दी करू नये यासाठी स्वयंसेवक व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन घरगुती गणपती मूर्ती संकलित करून त्याचे ठराविक कार्यकर्त्यांकडून विसर्जन करावे त्यानंतर त्या मूर्ती दान कराव्यात असे प्रशासनाने आवाहन केले होते.
त्यास राजे शिवछत्रपती मित्रमंडळाने मोठा प्रतिसाद दिला. प्रशासनाकडून व नागरिकांकडून या गणेश मंडळाचे व त्यांच्या स्वयंसेवकांचे कौतुक करण्यात आले.
शहरातील नागरिकांनी मंडळाच्या या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला:
राजे शिवछत्रपती मित्रमंडळाचे अध्यक्ष अमित घुमटकर, संतोष भांगे, योगेश पवार, विकी खैरनार, सागर खैरनार, अभिषेक भास्कर, अविनाश पाटील, अक्षय तेली, योगेश खैरनार, रेवन घुमटकर, रोनित घुमटकर, शुभम भंडलकर, सचिन मोहिते, गणेश भोजने, आकाश पाटील, सनी जाधव, अजय आहिरे, या सर्व कार्यकर्त्यांनी मूर्ती संकलनास मदत केली.