बारामती – तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ( Tuljaram Chaturchand College) २७ जानेवारी ते २९ जानेवारी २०२४ रोजी आय.क्यू.ए.सी. युवा महोत्सव २०२४ आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सांस्कृतिक विभागातर्फे विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. हे प्रामुख्याने सुगमगीत, भावगीत, वाद्यवादन, पश्चिमात्य गायन, वकृत्व, चित्रकला, व्यंगचित्र, मातीकला, पथनाट्य अशा विविध १८ प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आले. सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रास्ताविक व स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. भिमराव तोरणे यांनी केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कला क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना वाव मिळावा व यशाची उंची गाठावी यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या पाठीशी सतत उभे आहे, असे गौरवउद्गार काढले.
अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.अशोक काळंगे, डॉ.सचिन गाडेकर, डॉ. योगिनी मुळे व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार. अभिनंदन शहा, विद्यापीठ प्रतिनिधी सौरभ पांढरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल मोरे व सोमनाथ कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राजेंद्र कंडरे यांनी केले.