शिस्तीचा बारामती पॅटर्न

परिस्थिती नियंत्रणाखाली

बारामती (प्रतिनिधी) – कोरोना संक्रमित रिक्षाचालकाच्या संपर्कात आलेले व होम कॉरंटाईन असलेल्या सर्वांची तब्येत ठणठणीत असून ते आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहेत. संक्रमित रिक्षाचालकाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सर्व संशयितांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने बारामतीकराना दिलासा मिळाला आहे. सात दिवसांमध्ये परिस्थितीत सुधारणा असल्याने शिस्तीचा बारामती पॅटर्न अधोरेखित झाला आहे.

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले व सध्या होम कॉरंटाईन असलेल्या सर्वांची तब्येत ठणठणीत असल्याचे वैद्यकीय अधीक्षक सदानंद काळे यांनी सांगितले आहे. सर्व संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले हे दिलासादायक आहे. असे असले तरी कोरोनचे संकट अद्याप संपूर्णपणे टळलेले नाही त्यामुळे बारामतीकरांनी याबाबत खबरदारी घ्यावी असे आवाहनही डॉक्टर काळे यांनी केली आहे.

प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील व अण्णासाहेब घोलप यांनी लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केली. बारामतीकर त्याला प्रतिसाद देत आहेत . त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाखाली राहिली.लोकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असून, लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत तरी घरातच राहणे आवश्यक आहे. शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.