पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकविस दिवसाचा लॉक डाऊन पुकारला आहे. त्यामुळे अपेक्षित मागणी नसल्याने फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. सध्य स्थितीत पुणे विभागातून भाज्यांची अत्यल्प आवक होत आहे.
रविवारी येथील बाजारात 604 वाहनांमधून 11 हजार 38 क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून 5 ते 6 टेम्पो हिरवी मिरची, स्थानिक भागातून कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, काकडी प्रत्येकी सुमारे 5 टेम्पो, सिमी 4 ते 5, पारनेर येथून मटार सुमारे 50 पोती, घेवडा 2 टेम्पो, इतर भाजीपाल्याची अत्यल्प आवक झाली.
याविषयी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले,
लॉकडाऊनमुळे मार्केटयार्डात परराज्यातील मालाची आवक होत नाही. तसेच येथून इतर जिल्ह्यात तसेच राज्यात माल जात नाही. याखेरीज, शहरातील छोट्या मंडईमध्ये विक्रेत्यांना भाजीविक्रीसाठी वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे, खरेदीदारांची संख्या घटल्याने बाजारात मालाला उठाव नाही. शहरातील हॉटेल, टपर्या, खानावळी, हॉस्पिटल तसेच महामार्गालगतचे धाबे बंद आहेत त्याचा परिणाम फळभाज्या व पालेभाज्यांच्या मागणीवर झाला आहे.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 140-200, बटाटा : 160-220, लसूण : 700-1200, आले : सातारी 300-500, भेंडी : 200-300, गवार : 300-400, टोमॅटो : 50-70, दोडका : 120-200, हिरवी मिरची : 150-250, दुधी भोपळा : 150-250, चवळी : 200-250, काकडी : 100-150, कारली : हिरवी 120-200, पडवळ : 150-250, फ्लॉवर : 40-70, कोबी : 30-50, वांगी : 120-200, ढोबळी मिरची : 160-240, तोंडली : 200-300, शेवगा : 120-200, गाजर : 100-200, बीट : 60-80, घेवडा : 150-200, घोसावळे : 120-160, ढेमसे : 240-300, पावटा : 300-400, भुईमूग शेंग : 500-600, मटार : 450-500, नारळ (शेकडा) : 1800-2500.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 500-800, मेथी : 600-800, शेपू : 500-600, कांदापात : 700-1000, करडई : 400-600, पुदिना : 400-500, अंबाडी : 400-500, मुळे : 800-1000, राजगिरा : 500-600, चवळई : 400-500, पालक : 500-600