बारामती (प्रतिनिधी) – पोलीस खाते, पाटबंधारे खाते व शेजारील आठ शेतकरी यांच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्याने स्वतःच्या मोबाईलवर चित्रण करत विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामध्ये शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हनुमंत पांडुरंग सणस वय ६० रा. लाटे ता. बारामती असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. बारामती तालुक्यातील लाटे येथे शेतकऱ्याने पाटबंधारे विभाग महावितरण विभाग आणि पोलिसांना कंटाळून शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने व्हिडिओ तयार करून त्यामध्ये सर्व हाकिकत सांगितली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बारामती तालुक्यातील लाटेमध्ये सणस यांचे क्षेत्र आहे.
सणस यांच्या रानामध्ये येथील परिसरातील शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युतधारक विद्युत पंप बसवलेले असताना त्या शेतकऱ्यांना सणस यांनी काढायला सांगितले. सणस याचे रान मोकळे केले.
त्यानंतर हनुमंत सणस आणि त्याचा भाऊ त्या रानामध्ये जेसीबी घेऊन साफसफाई करण्यासाठी गेले असताना सणस यांना दमदाटी केली आणि खोट्या केसेस करू अशी धमकी देखील काही लोकांनी दिली.
त्यानंतर वारंवार पोलीस स्टेशन मधून हनुमंत सणस आणि त्यांचे बंधू यांना फोन येऊ लागले. या भितीला भिऊन हनुमंत सणस यांनी आत्महत्या केली आहे असे त्यांचे भाऊ जयवंत सणस यांनी सांगितले आहे
आत्महत्या करण्यापूर्वी हनुमंत सणस काय म्हणाले ? Baramati Farmer Suicide ।
आत्महत्या करण्याअगोदर केलेल्या व्हिडीओमध्ये हनुमंत सणस यांनी, “मी हनुमंत 26 फेब्रुवारीला 2024 ला आतम्हत्येचा इशारा दिला. मला इतका त्रास दिला आहे मी त्याला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझे वय 70 वर्षे आहेत.
माझ्या वावरात अतिक्रमण करुन मला दम देतात. माझ्या खिशात या संदर्भात चिठ्ठी लिहली आहे. वारंवार तक्रार देखील करुन पोलीसांनी उलट मला, माझ्या भावाला आणि मुलाला दम दिला.
जिथे अतिक्रमण केले त्याच जागेत मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या चिठ्ठीत ज्यांची नावे आहेत. ते माझ्या आत्महत्येला जबाबदार असून त्यांना तात्काळ अटक करावी.”असे म्हटले आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Baramati Farmer Suicide ।
शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान, आत्महत्या करणा-या शेतक-याच्या भावाने प्रतिक्रिया दिली. जयवंत सणस म्हणाले. स्थानिक पोलीसांनी देखील आम्हाला त्रास दिला. बारामती तालुक्यातील लाटेमध्ये क्षेत्र सणस यांचे क्षेत्र आहे.
सणस यांच्या रानामध्ये येथील परिसरातील शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युतधारक विद्युत पंप बसवलेले असताना त्या शेतकऱ्यांना सणस यांनी काढायला सांगितले.
सणस याचे रान मोकळे केले त्यानंतर हनुमंत सणस आणि त्याचा भाऊ त्या रानामध्ये जेसीबी घेऊन साफसफाई करण्यासाठी गेले असताना सणस यांना दमदाटी केली आणि खोट्या केसेस करू अशी धमकी देखील काही लोकांनी दिली.
त्यानंतर वारंवार पोलीस स्टेशन मधून हनुमंत सणस आणि त्यांचे बंधू यांना फोन येऊ लागले. या भितीला घाबरून हनुमंत सणस यांनी आत्महत्या केली आहे.