बारामती : झारगडवाडी गावात पुत्रप्राप्तीसाठी अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघड…

-नवनाथ बोरकर

डोर्लेवाडी (प्रतिनिधी) : जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनावर विज्ञानाच्या माध्यमातून लस शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावात पुत्रप्राप्तीसाठी जादूटोणा करत अंधश्रद्धेला खत पाणी घालण्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे.

झारगडवाडी गावातील स्मशान भूमीजवळ मोठ्या स्वरूपाचा उतारा ठेऊन काही अद्यात व्यक्तीने पुत्रप्राप्ती साठी हा अघोरी प्रकार केला असावा, असा अंदाज अंनिसचे बारामती कार्याध्यक्ष विपुल पाटील, सदस्य ऋतुराज काळकुटे यांनी व्यक्त केला आहे. तसेच याबाबत अंनिसच्या बारामती शाखेकडून तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे विपुल पाटील यांनी सांगितले आहे..

उताऱ्यात – घोड्याचे चार नाल, चार कोंबडे, चार मासे, चार कवळे, चार टोप्या, लांब केस, चार लिंब, चार नारळ, चार काळे पीस, वेगवेगळी प्रकारची फळे, लहान आरसे, अश्या अनेक प्रकारच्या साहित्याचा या उताऱ्यात समावेश होता.

विशेष म्हणजे असा प्रकार पाहून नागरिक भीतीपोटी अन्नपाणी देखील सोडून देतात, अश्या लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते विपुल पाटील, ऋतुराज काळकुटे व झारगडवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र टिंगरे यांनी उताऱ्यातील जिवंत असलेल्या कोंबड्याच्या मटणाचा आस्वाद घेत भोंदूबाबा करत असलेल्या जादूटोण्याची लोकांच्या मनामध्ये असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला केली आहे..

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.