नवी दिल्ली – करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेल्या बागा, सार्वजनिक उद्याने आणि बार सोमवारपासून खुले केले जाणार आहेत.
दिल्ली डिझास्टर मॅनेजमेंट ऍथॉरिटीने शनिवारी या विषयीचा आदेश जारी केला आहे. दिल्लीतील सर्व बार दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवले जाणार आहेत. बार मालकांना कोविडविषयक निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
गोल्फ क्लब आणि योगाही सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. मात्र अजून सिनेमागृहे, व्यायामशाळा आणि स्पा मात्र बंदच ठेवण्यात आले आहेत.
ते 28 जून पर्यंत बंद राहतील असे ऍथॉरिटीने कळवले आहे. दिल्लीत करोना पुर्ण नियंत्रणात आला आहे. तेथे अजूनही करोनाचे रुग्ण आढळून येत असले तरी त्याचे प्रमाण मात्र खुपच कमी आहे.