‘यामुळे’ स्पुटनिक व्ही लसीचे वितरण लांबले

नवी दिल्ली – दिल्लीच्या दोन हॉस्पिटल्समध्ये आजपासून स्पुटनिक व्ही लसींचे वितरण सुरू होणार होते, पण ते आता लसीच्या पुरवठ्याअभावी आणखी काही काळ लांबले आहे. ही लसच उपलब्ध न होऊ शकल्याने आज तेथे होणारे लसीकरण रद्द करावे लागले आहे.

दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल आणि मधुकर रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटल या दोन ठिकाणी या लसीकरणाचे डोस आजपासून दिले जाणार होते. पण संबंधित रुग्णालयांमध्ये ही लसच अजून उपलब्ध होऊ शकलेली नाही. रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की आता बहुतेक पुढील आठवड्यात ही लस उपलब्ध होऊ शकेल.

फोर्टिस हेल्थकेअरने गुडगाव आणि मोहाली येथील रुग्णालयातही शनिवारपासून ही लस उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. पण त्यांनाही लस अजून मिळू शकलेली नाही. वरील सर्व रुग्णालयांमध्ये ही लस 1145 प्रतिडोस या दराने विकत दिली जाणार होती.

स्पुटनिक व्ही ही लस रशियातून आयात करण्याचा परवाना हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबरोटरी कंपनीला देण्यात आला आहे. या लसींच्या वितरणाला विलंब का लागला आहे, याचा खुलासा अजून त्यांच्याकडूनही आलेला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.