Pune Crime : कासेवाडीत तडीपार गुंडासह तीन सराईत गुन्हेगारांना अटक

पुणे – कासेवाडी परिसरात एका तडीपार गुंडासह तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. यातील दोघांकडून हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने केली. या तीघांवरही खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व जनतेच्या मालमतेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पुणे शहरातील पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड , दरोडा , जबरी चोरी , घरफोडी चो – या करणारे सराईत गुन्हेगार , यांचा शोध घेवुन त्यांचे हालचालीवर नजर ठेवुन त्यांचेविरुध्द कठोर कारवाई करणेबाबत आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

त्यानूसार दिनांक – 19/06/2021 रोजी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक अमोल पवार यांना सध्या तडीपार असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार सुरज उर्फ पाप्या जाधव हा कासेवाडी येथील पतसंस्थे जवळ उभा असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार त्याला अटक करण्यात आली. तर पोलीस हवालदार अजय थोरात यांना मिळालेल्या खबरेनूसार सध्या पॅरोलवर असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार रवी कोळी (22) याला लोखंडी कोयत्यासह कासेवाडीत ताब्यात घेण्यात आले.

तसेच पोलीस शिपाई तुषार माळवदकर यांना मिळालेल्या खबरीनूसार रेकॉर्ड वरिल गुन्हेगार आझिम शेखला गुप्तीसह कासेवाडी येथील 10 नंबर कॉलनी जवळ पार्किंगमध्ये पकडण्यात आला.

सदर आरोपी कडुन 1 कोयता व 1 गुप्ती जप्त करुन खडक पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सदर आरोपीवर जबरी चोरी, घरफोडी , चोरी , वाहनचोरी प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.