मतदान जागृतीसाठी बॅंकाही सरसावल्या

मतदानाचा टक्‍का वाढविण्यासाठी घेतला पुढाकार

पुणे – 21 रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्‍का वाढावा, याकरिता केल्या जाणाऱ्या जनजागृतीमध्ये बॅंकांनीदेखील सहभाग घेतला आहे. आपल्या खातेदारांना मतदान करण्याचे मेसेज राष्ट्रीकृत बॅंकांकडून पाठविले जात आहेत.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्‍केवारी वाढावी, याकरिता निवडणूक आयोगाकडून जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पथनाट्य, विद्यार्थी प्रभात फेरी, घोषवाक्‍य स्पर्धा, मध्यवर्तीठिकाणी मतदानाचे आवाहन करणारे पोस्टर्स तसेच मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देणे, पिण्यासाठी पाणी, व्हीव्हीपॅडचे प्रत्यक्षिके, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, रॅम व तळमजल्यावर मतदान केंद्रांची व्यवस्था करणे या बाबींचा समावेश आहे. मात्र, या एवढे करूनही लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्‍का अपेक्षित उद्दिष्ट गाठता आले नाही.

दरम्यान, येत्या 21 तारखेला राज्यातील 288 विधानसभा जागांकरिता मतदान होत आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होत असले, तरी देखील मतदानाच्या आदल्या दिवशी रविवारची सार्वजनिक सुट्टी आहे. तर सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये व खासगी आस्थापनांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे. एकापाठोपाठ दोन जोडून सुट्ट्या आल्याने अनेक नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडू शकतात. त्याचा परिणाम मतदान टक्‍का घटण्यावर होऊ शकतो. त्यामुळे मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी राष्ट्रीय बॅंकांकडून खातेदारांना मतदान करण्याचे आवाहन करणारे मेसेज पाठविले जात आहेत.

ग्राहक मेसेज आवर्जून वाचताहेत
बॅंकेमधील शिल्लक रक्‍कम, जमा झालेली रक्‍कम, एटीएममधून रक्‍कम काढल्यानंतर येणारे मेसेज तसेच ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारीवगळता अन्य मेसेज बॅंकेकडून आल्याने नागरिकदेखील, असे मेसेज आवर्जून वाचत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)