गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तीन हजार व्यक्तींकडून प्रतिज्ञापत्र

नगर  – नगर-विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर व जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 6 हजार 325 व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व व्यक्तींकडून एका वर्षांसाठी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत3 हजार 37 व्यक्तींनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले असून, उर्वरीत व्यक्तींकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.

विधानसभा निवडणूकीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनामार्फत खबरदारी घेण्यात येत आहे. एमपीडीए कायद्यांतर्गत काही सराईत गुन्हेगारांना एका वर्षासाठी स्थानबध्द करून, त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे. काहींना शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 6 हजार 325 व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या व्यक्तींकडून एक वर्षासाठी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. शहर व जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामार्फत त्यांच्या हद्दितील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी काहीकडून 3 हजार 288 वयक्तीक प्रतिज्ञापत्रक लिहून घेतले आहे. तर एक हजार 106 प्रलंबित केसेस आहे. तसेच जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण असे कोणतेही कृत्य करणार नसल्याची हमी या व्यक्तींनी त्यांच्या जामिदारामार्फत दिली आहे. उर्वरीत दिड हजार व्यक्तींकडून लिहून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.