नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) श्री रामजन्मभूमी संकुलातील नवनिर्मित राम मंदिरात ( Ram Mandir ) रामलल्लाच्या नवीन मूर्तीची पहिली आरती करणार आहेत. 150 वैदिक आचार्य प्राणप्रतिष्ठेच्या विधीचा संपूर्ण
श्री रामजन्मभूमी ( Ram Janmbhumi ) तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी ( Govind giri) यांनी सांगितले की, काशीचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्यांच्या गटाची निवड करण्यात आली आहे. काशीचे वैदिक अभ्यासक लक्ष्मीकांत दीक्षित हे प्रमुख आचार्य असतील. त्यांच्यासोबत 150 पंडितांचा समूह असेल, जो विविध पारायण आणि धार्मिक कार्य पार पाडतील.( Ramlalla Pranpratishthapana )
सर्व विधी काशीचे प्रसिद्ध वैदिक पंडित गणेशवर शास्त्री द्रविड यांच्या देखरेखीखाली केले जातील. 17 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढून रामजन्मभूमी संकुलात प्रतिष्ठापना केली जाईल. त्यानंतर 18 जानेवारीपासून पूजा आणि विधीची प्रक्रिया सुरू होईल.
गोविंद देवगिरी यांनी सांगितले की, रामजन्मभूमी संकुलात पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी सर्वप्रथम जटायू मंदिरात जातील. जटायू हे त्या कारसेवकांचे, त्याग करणार्यांचे प्रतीक आहे, ज्यांनी धार्मिक कार्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून जटायूला पुष्पहार अर्पण करतील. यानंतर ते अभिषेक सोहळ्यात सहभागी होतील. त्यानंतर ते उद्घाटनपर भाषण करतील. कार्यक्रमात देशभरातून उपस्थित ऋषीमुनी संतांचे आशीर्वाद घेणार आहेत. यानंतर सोहळ्यात देश-विदेशातील पाहुण्यांना रामलल्लाचे दर्शन दिले जाईल.