Bangladesh Fire | बांगलादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी रात्री उशिरा आगीचा तांडव पाहायला मिळाला. येथील सहा मजली शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीत भाजलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोग्य मंत्री समंथा लाल सेन यांनी सांगितले की, ‘गुरुवारी रात्री उशिरा ढाक्याच्या डाउनटाउन भागात आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचलेल्यांना सुखरूप बाहेर काढले. या अपघातात 43 जणांचा मृत्यू झाला. तर 22 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.’
माहिती देताना आरोग्य मंत्री समंथा लाल सेन म्हणाले की ,’अग्निशमन दलाच्या जवानांनी शॉपींग मॉलमधून मृतदेह बाहेर काढले. ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये महिला आणि मुलांसह 33 जणांना मृत घोषित करण्यात आले. 10 जणांना शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरीमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस महानिरीक्षकांनी नंतर मध्यवर्ती पोलीस रुग्णालयात आणखी एका मृत्यूची पुष्टी केली, एकूण संख्या 44 झाली. ही आगीची घटना बेली रोड परिसरातील शॉपिंग मॉलमध्ये घडली असून तेथे अनेक रेस्टॉरंट आहेत.’
मीडिया रिपोर्ट्सनुसार,’शॉपिंग मॉलच्या पहिल्या मजल्यावरील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून आग लागली. यानंतर काही वेळातच आगीने संपूर्ण शॉपिंग मॉलला वेढले. अनेक रेस्टॉरंटमध्ये गॅस सिलिंडर असल्याने आगही वेगाने पसरली. आगीमुळे अनेक लोक इमारतीत अडकले होते. शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीच्या कारणाचा शोध घेण्यासाठी अग्निशमन विभागाने एक पथक तयार केले आहे.’
हेही वाचा
prem chopra | प्रेम चोप्राने केला कपूर कुटुंबाबत खुलासा