औंध (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त बाणेर येथे कोविड काळात उल्लेख सेवा केल्याबद्दल डॉक्टर व पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून बाणेर शिवसेनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे, डॉ.दिलीप मुरकुटे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, विजय बाविस्कर, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, ॲड.दिलीप शेलार , ॲड.पांडुरंग थोरवे, ॲड. सुदाम मुरकुटे, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, बाळासाहेब भांडे, ॲड. शिवाजी कदम, नितीन चांदेरे, सरपंच मयुर भांडे, विशाल विधाते, आशुतोष आमले, सुनील कळमकर ,श्याम बालवडकर, मकरंद कळमकर, संतोष भोसले आदी उपस्थित होते.
डॉ. दिलीप मुरकुटे म्हणाले, कोरोना कालावधीमध्ये डॉक्टरांनी अनेकांना जीवदान दिले तर घर बसल्या वस्तुस्थितीची माहिती जीवावर उदार होऊन पत्रकार देखील देत होते. तसेच कोरोनाशी संघर्ष करत होते. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री देखील महाराष्ट्रातील प्रत्येक आपत्ती समोर संघर्ष करून सर्वसामान्यांच्या पर्यंत आधार व मदत पोहचवत आहेत. तसेच पुढील काळात देखील पूरग्रस्तासाठी भरीव मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नगरसेवक बाबूराव चांदेरे म्हणाले की, राज्यात ज्या पद्धतीने महविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र येऊन काम करत आहेत त्या पद्धतीने स्थानिक पातळीवर देखील सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. पुणे महानगर पालिकेमध्ये यावेळी निश्चितच महाविकस आघाडीची ची सत्ता येणार आहे त्या साठी महविकस आघाडीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रच राहिले पाहिजे.
ज्ञानेश्वर तापकीर म्हणाले, राज्यामध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बाणेर गाव देखील एकत्र होऊन पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेईल. राज्याचे मुख्यमंत्री पूरग्रस्त नागरिकांचे प्रश्न सोडवत असताना बाणेर परिसरातील नागरिक देखील आपला वाटा निश्चितपणे उचलतील.
यावेळी पत्रकारांचा व डॉक्टरांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या पेट्रोल दरवाढीचा निषेध व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रत्येकी दोन लिटर पेट्रोलच्या कुपनचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास बाणेर परिसरातील सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार डॉक्टर वकील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक शिवसैनिक डॉक्टर दिलीप मुरकुटे यांनी केले होते.