पुणे – मागील दीड वर्षांहून अधिक देशात करोना संसर्गामुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. सतत घरात राहून अनेकांना मानसिक समस्या भेडसावत आहेत. यातूनच आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात देहुरोड येथे एका १६ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊ आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृत मुलीच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड येथील प्रगती कॉलनी येथे मुलगी आपल्या वृद्ध आजीसोबत राहत होती. गेल्या वर्षीच तिने दहावीची परीक्षा दिली होती.
दरम्यान आज दुपारच्या सुमारास मुलीने घरातील किचनमध्ये जाऊन लोखंडी एँगलच्या सहाय्याने ओढणीने गळफास घेतला. बऱ्याच वेळेनंतरही आपली नात परतली नाही, शिवाय दरवाजा आतून लावलेला होता, त्यामुळे आजीने आजुबाजूच्या नागरिकांना बोलवून दरवाजा तोडला. आत गेल्यानंतर मुलीने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे दिसून आले. पुढील तपास देहुरोड पोलीस करत आहेत.