स्वस्तातले सिमेंट- स्टिल पडले महागात; राज्यातील अनेकांना 500 कोटीचा गंडा घालून शिवानंद झाला पसार

नगर (शंकर दुपारगुडे) – बिगर कष्टाने कमी काळात ज्यास्त पैसे कमविणाऱ्यांची संख्या आज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यासह देशात आत्तापर्यंत अनेक आर्थीक घोटाळे उघड झाले. कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरणे ताजे असताना काही नागरीकांनी फुकट मिळणाऱ्या पैशाच्या अमिषाला बळी पडून कोट्यावधी रुपयाची फसवणूक करून घेतली आहे. राज्यात आर्थीक हेराफेरी करीत एका शिवानंद नावाच्या व्यक्तीने स्वस्तात सिमेंट व स्टील देण्याच्या आमिषाने अनेकांची आर्थीक लुट करुन दुःखाच्या खाईत लोटले आहे.

याघटनेची अधिक माहीती अशी कि, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील यड्राव फाटा परिसरात राहणारा शिवानंद दादू कुंभार याने दोन राज्यात स्वस्तात सिमेंट व स्टील देण्याची नवी योजना पटवून देत अनेकांना गळाला लावले. ज्यांना सिमेंट – स्टील नको असले मात्र फायदा करून घ्यायचे असेल तर काही रोख रक्कम भरली तर त्यांना त्या बदल्यात वर्षाला दुप्पट रक्कम मिळणार असल्याचे सांगत नवी ही योजना सन २००९ पासुन सुरु केली.

या फसव्या योजनेचा शुभारंभ अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथुन केला. सुरूवातील शिवानंद कुंभार याने माणसाला माणसं जोडत जावून आपले जाळे कोपरगाव पासुन कर्नाटक राज्यापर्यंत पसरवले.

या दरम्यान अनेकांना काही प्रमाणात परतावा मिळू लागल्याने त्यांची पैशाची हाव वाढत गेली. ज्यांनी सुरूवातीला लाखात गुंतवणूक केली त्यांनी कोटीत गुंतवणूक करुन मालामाल होण्याचे स्वप्न पहात इतरांना दाखवत होते. त्यांना मिळणारा परतावा पाहुन काहींनी जवळ पैसे नसताना शेतजमीन, सोने विकून शिवानंदच्या या फसव्या योजनेत गुंतवणूक केली.

दरम्यान करोनाच्या काळात लाॅकडानचा गैरफायदा घेत शिवानंद कुंभार याने गुंतवणुकदारांना त्यांचा आर्थीक परतावा व सिमेंट स्टील देण्याचे अचानक बंद केल्याने दोन राज्यात खळबळ उडाली. अनेकांकडून कोट्यावधी रुपये आगाऊ रक्कम घेवून त्या शिवानंदने आनंद घेतला पण पैसे देवून दुःख घेण्याची वेळ हजारो नागरीकावर आली आहे.

एकट्या कोपरगाव तालुक्यातून तब्बल शंभर कोटी वसुल केले तर राज्यातील अहमदनगर,कोपरगाव औरंगाबाद, वैजापूर,नाशिक,सिन्नर,येवला,बिड,आष्टी,कडा,पुणे, इचलकरंजी,कोल्हापूर सांगली सातारा, बेळगाव निप्पाणी,शंकेश्वर आदी भागातून सरासरी चारशे कोटी वसुल करून फरार झाला आहे. शिवानंद कुंभार व त्याचा जोडीदार किरण लक्ष्मण कडेमणी यांनी गेल्या १० वर्षात अनेकांना आपल्या जाळ्यात ओडून आर्थीक शिकार केली आहे. या फसवणुकीत विविध ठिकाणचे मोठ मोठे व्यापारी, बांधकाम क्षेञातील बडे व्यवसायीक, विविध क्षेञातील मान्यवरांचा सामावेश आहे. पैशाच्या अमिषाने गुंतवणूक करणाऱ्यांना कपाळावर हातमारुन घेण्याची वेळ आली आहे.

करोनाच्या आर्थीक संकटात बेकायदा गुंतवणुक वाढली
एकाच वेळी अपेक्षीत स्टील हवे असेल तर संपुर्ण स्टील चालु दरा नुसार १० ते १२ रु कमी दर प्रती किलो लावला जात होता तर सिमेंटचा दर चालु दरा तब्बल ७० ते ८० रुपये कमी दराने प्रति गोणी लावला जात असे व तो बुकींग केलेला एकुण माल ७ महीण्याच्या कालावधीत २० टक्के मिळणार असे सांगितले जात असे तसेच ज्यांनी रोख रक्कम गुंतवली त्यांना गुंतवलेल्या रकमेला प्रति महीण्याला ५ ते ६ टक्के व्याज दिले जात होते अर्थात ही व्याजाची रक्कम दर तिन महीण्याने एकञ दिली जात होती.

शिवानंद कुंभार १८ जुलै पासुन नाॅट रिचेबल..
शेकडो कोटी रूपये जमा करून शिवानंद कुंभार इचलकरंजी येथील यड्राव फाटा परिसरातील बजाज शोरूमच्या पाठिमागील राहते घर व इतर स्थावर मालमत्तेची विल्हेवाट लावून आपल्या कुटूंबासह नाॅट रिचेबल झाल्याने दोन राज्याची झोप उडाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.