मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्लॅस्टिकपासून बनविलेल्या नायलॉन मांजा किंवा अशा कोणत्याही कृत्रिम पदार्थांच्या वापराला, विक्रीला आणि साठवणुकीवर 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत पतंग उत्सवाच्या दरम्यान बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश बृहन्मुंबईचे पोलीस उप आयुक्त विशाल ठाकूर यांनी काढले आहे.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात #नायलॉन_मांजा किंवा अशा कोणत्याही कृत्रिम पदार्थांचा वापर, विक्री आणि साठवणुकीवर १० फेब्रुवारीपर्यंत #पतंग उत्सवाच्या दरम्यान बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश बृहन्मुंबईचे पोलीस उप आयुक्त विशाल ठाकूर यांनी काढले आहेत. pic.twitter.com/aUdrvfsdTU
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 16, 2023
दरवर्षी पतंग उडवण्याच्या उत्सवात प्लॅस्टिक किंवा तत्सम सिंथेटिक घटकाद्वारे तयार केलेल्या नायलॉन मांजामुळे माणसांना व पक्ष्यांना दुखापत होत असल्याचे आढळून आले आहे व अशा जखमा अनेकदा प्राणघातक ठरतात, त्यामुळे नायलॉन किंवा प्लॅस्टिक किंवा सिंथेटिक धाग्यांपासून बनवलेल्या पतंग उडवण्याच्या नायलॉन मांजाच्या जीवघेण्या परिणामांपासून माणसांचे आणि पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/indias-export-declines-by-12-2-to-34-48-billion-in-december/
हा आदेश दि. 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड प्रक्रिया संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये दंडनीय राहणार आहे, असे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय यांनी काढले आहे.