Virat Kohli – भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याने पाहायला मिळाले. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने दोन शानदार शतके झळकावली. विराटच्या या मालिकेतील दमदार कामगिरीसाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला. विराटसाठी मागील तीन वर्ष त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब वेळ राहिली. या काळात त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये एकही शतक करता आले नाही. त्यामुळे अनेक वर्षांनंतर त्याचा जुना फॉर्म पाहून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत.
अशा परिस्थितीत विराटचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सनेही ट्विटरवर पोस्ट कोहलीची स्तुती केली आहे. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ११० चेंडूत १३ चौकार आणि ८ षटकारांसह १६६ धावांची तुफानी खेळी केली होती. त्याच्या या खेळीबद्दल प्रतिक्रिया देताना मिस्टर ३६० एबी डिव्हिलियर्सने ट्विट केले की, ‘विराट कोहली! वेगळी पातळी!
शेवटच्या सामन्यानंतर विराट कोहलीला त्याच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरल्याबाबत प्रश्न विचारण्यात आले,. ज्यावर विराट कोहली म्हणाला की, “माझ्यासाठी वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. मी सूर्यकुमार यादवला याआधीही सांगितले होते की मला इतकी चांगली सुरुवात होऊन बरीच वर्षे झाली आहेत. विश्वचषकाच्या वर्षात मला इतकी अप्रतिम सुरुवात मिळाली याचा मला आनंद आहे. मला माहीत आहे की मी सातत्यपूर्ण कामगिरी करू शकतो. माझ्या चांगल्या कामगिरीमुळे संघालाही महत्त्वाचे योगदान मिळत आहे आणि तुम्ही सर्व फलंदाजही चांगली फलंदाजी करत आहात.”
Virat Kohli! Different level💪
— AB de Villiers (@ABdeVilliers17) January 16, 2023