नवी दिल्ली – डिसेंबर 2022 मध्ये भारताची निर्यात 12.2 टक्क्यांनी घसरून ती 34.48 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. गेल्या वर्षीच्या म्हणजे सन 2021 च्या डिसेंबर महिन्यात ही निर्यात 39.27 अब्ज डॉलर्स इतकी होती, असे वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले.
डिसेंबर 2022 मध्ये आयात देखील घसरून 58.24 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे जी मागील वर्षी याच महिन्यात 60.33 अब्ज डॉलर्स इतकी होती. तथापि या आर्थिक वर्षातील एप्रिल-डिसेंबर या कालावधीत देशाची एकूण निर्यात 9 टक्क्यांनी वाढून 332.76 अब्ज इतकी झाली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
खळबळजनक! वरिष्ठ वकिलाची उच्च न्यायालयातच 6 गोळ्या घालून हत्या
या कालावधीत आयात 551.7 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सांगितले की, जागतिक पातळीवरील संकटे असूनही, भारताने या आर्थिक वर्षात निर्यात वाढवण्याचे मोठे प्रयत्न केले आहेत.