अफगाणिस्तानमधील टीव्हीवर महिला कलाकारांना बंदी; तालिबानी राजवटीने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचना

काबूल – ऑगस्ट महिन्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये सत्ता प्रस्थापित करणाऱ्या तालिबानी राजवटीने आता मनोरंजन क्षेत्राकडे नजर वळवली असून अफगाणिस्तानमधील टीव्ही कार्यक्रमात महिला दिसता कामा नयेत असा निर्णय जाहीर केला आहे.

म्हणजेच टीव्ही वाहिन्यांनी महिला असणाऱ्या कार्यक्रमांचे प्रसारण करू नये असे तालिबान्यांनी स्पष्ट केले आहे याबाबत तालिबानी राजवटीने काही मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या असून वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांनाही बातम्या सांगत असताना बुरखा परिधान करावा लागणार आहे. 

इस्लाम धर्माच्या विरोधात मतप्रदर्शन करणारा कोणताही कार्यक्रम दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे. अफगाणिस्तान मधील वाहिन्यांना आता अशीच कार्यक्रम किंवा मालिका दाखवता येतील ज्यामध्ये एकही महिला कलाकार नाही. 

वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटाबाबत सूचना जारी करण्यात आल्या असून इस्लाम विरोधात असणारा कोणताही चित्रपट किंवा इस्लाम बाबत चित्रे किंवा रेखाचित्रे दाखवणारा कोणताही चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही.

 टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांनी अफगाणिस्तानच्या आणि इस्लामच्या परंपरेचे भान राखावे असेही स्पष्ट शब्दात बजावण्यात आले आहे. अफगाणिस्तान मध्ये गेल्या 20 वर्षापासून खाजगी वाहिन्या आपले काम करत आहेत त्या माध्यमातून देश-विदेशातील कार्यक्रम अफगाणिस्तानमधील जनतेला पाहता येतात पण आता. 

इथे हे कार्यक्रम सुद्धा अफगाणी जनतेला पाहता येणार नाहीत तालिबान राजवट प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी महिलांचा योग्य सन्मान राखला जाईल असे आश्‍वासन त्यांनी दिले. असले तरी प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचना पाहता त्यांना महिलांना कोणताही सन्मान द्यायचा नाही असेच स्पष्ट होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.