पॅनकार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. सरकारी आणि निमसरकारी क्षेत्राशी संबंधित अनेक कामांमध्ये याचा वापर केला जातो. आपण जेव्हा नोकरीला लागतो, तेव्हा आपल्याकडे पॅनकार्ड मागितले जाते.
याशिवाय अनेक शासकीय तसेच आर्थिक कामे करण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. दुसरीकडे, अनेक लोक आहेत जे पॅनकार्ड संबंधित अनेक चुका करतात, ज्यामुळे त्यांना मोठा दंड भरावा लागतो. पॅनकार्ड संदर्भात काही चूक केल्यास भविष्यात तुमच्याकडून मोठा दंड आकारला जाऊ शकतो. चला मग, आज आम्ही तुम्हाला पॅन कार्डशी संबंधित अशा गंभीर चुकीबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.
* जर तुम्ही एकाच वेळी दोन पॅनकार्ड बाळगत असाल तर अशा परिस्थितीत तुम्हाला मोठा दंड आकारला जाऊ शकतो. एवढेच नाही तर तुमचे बँक खातेही गोठवले जाईल. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील, तर त्यातील एक त्वरित सरेंडर करा.
* जर तुम्ही दुसरे पॅन कार्ड सरेंडर केले नाही तर तुम्हाला भविष्यात मोठा दंड भरावा लागू शकतो. आयकर कलम 272B मध्ये ही तरतूद करण्यात आली आहे.
* दुसरे पॅन कार्ड सरेंडर करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सामान्य फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
* त्यानंतर, फॉर्म भरल्यानंतर, तो एनएसडीएल कार्यालयात दुसर्या पॅनकार्डसह जमा करावा लागेल. असे न केल्यास भविष्यात या चुकीसाठी तुम्हाला १० हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.