जस्टिन बीबर, लेडी गागा “ग्रॅमी पुरस्कारा’साठी नॉमिनेट

द रिकॉर्डिग अकादमीने 2022मध्ये होणार असलेल्या 64व्या ग्रॅमी पुरस्कारासाठीचे नॉमिनेशन्स जाहीर केले आहेत. ग्रॅमी पुरस्कार-2022 साठी प्रत्येक गटातून 10 जणांना नॉमिनेट करण्यात आले आहे. 

संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी ऍवार्डससाठी निवड झालेल्या पुरस्कारकर्त्यांना पुढील वर्षी 31 जानेवारीला लॉस अँजेलिस येथे आयोजित सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी ग्रॅमी पुरस्कार एकूण 26 गटांमध्ये देण्यात येणार आहे. 

“ग्रॅमी ऍवार्डस-2022’साठी 11 नोड्‌ससोबतच जॉन बॅटिस्ट, जस्टिन बीबर, डोझा कॅट आघाडीवर आहे. तसेच टेलर स्विफ्ट, कान्ये वेस्ट, टोनी बॅनेट, लेडी गागा आणि लिल नास एक्‍स हे ग्रॅमीच्या टॉप ऍवार्ड “अल्बम ऑफ द ईयर’साठी नॉमिनेट झाले आहेत. 

ग्रॅमी पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट युवा कलाकार पुरस्कारासाठी अरोज आफताबी, जिमी ऍलेन, बेबी कीम आणि फिनीश यांना मानांकन देण्यात आले आहे. करोना काळानंतर यंदाच्या पुरस्कार सोहळ्याकडे संपूर्ण सिनेसृष्टीचे लक्ष वेधले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.