तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन २०२४–२५ चे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. ३४२ कोटी ७८ लाख ७७ हजार १११ रुपये जमेचे अंदाजपत्रकात असून ३४२ कोटी ७६ लाख १६ हजार रुपये खर्च दर्शविला आहे. यंदा मालमत्ता कर वगळता इतर सुविधांच्या शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे.
अंदाजपत्रकास विकास कामांसाठी विशेष तरतूद केली आहे. हे अंदाजपत्रक प्रशासन अधिकारी सुरेंद्र नवले व मुख्याधिकारी एन.के.पाटील यांनी सादर केले आहे. या अंदाजपत्रकात स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते व नगरपरिषदेची नवीन कार्यालयीन इमारत बांधणी यासाठी विशेष तरतूद केली आहे.
या अंदाजपत्रकात घरपट्टी, पाणीपट्टी, शासकीय अनुदान, अंशदान व शासकीय अर्थसहाय्य तसेच नगरपरिषदेच्या स्थावर मालमत्तेचे भाड्याचे उत्पन्न, सेवा फी, नोंदणी व लायसन्स, ना हरकत प्रमाणपत्र, इमारत बांधकाम परवाना फी, ठेवीवरील व्याज आदींमधून नगरपरिषदेस २९६ कोटी ०२ लाख ७७ हजार ५०० रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.
सर्व खर्च वजा होता २ लाख ६१ हजार १११ रुपये शिल्लक राहत असल्याचे लेखापरीक्षक नरेंद्र कणसे, लेखापाल कैलास कसाब व वरिष्ठ लिपिक राजश्री जगताप यांनी सांगितले.
अंदाजपत्रकातील ठळक खर्चाच्या बाबी
– आस्थापना १४ कोटी २५ लाख,८० हजार
– प्रशासकीय खर्च २५ कोटी ७८ लाख ७१ हजार
– नगरपरिषद मालमत्त्यांच्या दुरुस्त्या ६ कोटी ५४ लाख ४९ हजार
– नविन प्रशासकीय इमारत १ कोटी
– भुयारी गटार योजना २० कोटी
– नाट्यगृह बांधणे १० कोटी
– रस्त्यांसाठी ४ कोटी
– पाणी पुरवठा २० कोटी
– शाळा क्रीडांगण २ कोटी
– अभ्यासिका बांधणी १ कोटी
– भाजी मंडई ३ कोटी
– शिव शंभो स्मारक १ कोटी
– प्रधानमंत्री आवास योजना झोपडपट्टी पुनर्वसन ३ कोटी
– नमामी चंद्रभागा अंतर्गत ३१ कोटीची तरतूद
या सुविधांचे वाढले कर
– नळ कनेक्शन
– जाहीरात
– जागा भाडे (नगर परिषद जागा)
– नक्कल शुल्क
– सर्व्हेअर, आर्किटेक, इंजिनीअर लायसन्स शुल्क,
– सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य प्रतिदिन आकार
– ना हरकत दाखले शुल्क
– ना हरकत दाखला व्यावसायिक प्रमाण पत्र शुल्क
– मालमत्ता हस्तातर शुल्क
– नकाशाची खरी नक्कल शुल्क
– नकाशाची खरी नक्कल बांधकाम शुल्क
– इमारत पाडणे ना हरकत दाखला शुल्क
– बांधकाम पाडल्याचे प्रमाणपत्र शुल्क
– झोन दाखला शुल्क
– भाग नकाशा शुल्क
– केबल खोदाई शुल्क