Chhagan Bhujbal | राज्यातील पाच टप्प्यातील लोकसभा निवडणूक पार पडली आहे. येत्या 4 जून रोजी मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणूकानंतर लगेच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मुंबईत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे.
निवडणूक आयोगाकडून विधानसभेचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच अजित पवार गटाकडून जोरदार तयारी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या सभेदरम्यान अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीकडून मिळणाऱ्या जागावाटपाबाबत मोठे विधान केले आहे.
‘विधानसभेला लोकसभेसारखी जागावाटपाची खटपट होता कामा नये’
छगन भुजबळ यांनी महायुतीकडून विधानसभेत 80 ते 90 जागा मिळाल्या पाहिजेत, अशी सभेत मागणी केली आहे. “लोकसभा निवडणुकीत 2019 ला निवडून आलेल्या जागांचा निकष आमच्यासाठी लावण्यात आला. आता विधानसभेला लोकसभेसारखी जागावाटपाची खटपट होता कामा नये. यासाठी आताच भाजपाला त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला त्याची आठवण करून द्या,” अशी मागणी भुजबळ यांनी अजित पवारांकडे केली आहे.
“लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको. अजित पवारांना सांगणं आहे की, आमदारांची कामे ताबडतोब मंजूर करा, आचारसंहिता सुरू होण्यापू्र्वी कामाचा नारळ फुटला पाहिजे. त्याचा फायदा आमदारांना होईल, विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळायला हवा. आम्हाला एवढ्या जागा हव्यात हे त्यांना सांगावे लागेल. जर 80-90 जागा मिळाल्या तर 50-60 निवडून येतील. आताच सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे,” अशी मागणी भुजबळ यांनी केली. Chhagan Bhujbal |
दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला चारच जागा मिळाल्या. त्यापैकी दोन जागांवर मित्र पक्षातून उमेदवार आयात करावे लागले होते. तर नाशिकची जागा भुजबळांऐवजी शिंदे गटाला देण्यात आली. त्यामुळे आता विधानसभेसाठी जागा वाटपावरून देखील रस्सीखेच होऊ नये, यासाठी अजित पवार गटाकडून तयारी सुरू करण्यात आल्याचे दिसत आहे. Chhagan Bhujbal |
हेही वाचा:
उत्तर प्रदेशातील ‘या’ 8 जागांवर भाजपला यंदाही बसणार फटका ; जाणून घ्या काय आहेत नेमकी कारणं