Maharashtra Premier League 2024 (Pune) – स्वतःवरचा आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हा युवा खेळाडूंसाठी यशाचा खरा मार्ग असल्याचे मत भारतीय खेळाडू, ‘आयपीएल’मधील चैन्नई सुपरकिंग्जसह ‘पुणेरी बाप्पा’ (‘Puneri Bappa) संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेच्या दुसर्या हंगामासाठी ‘पुणेरी बाप्पा’ संघाची तयारी जय्यत सुरू असून ‘पुणेरी बाप्पा’ संघाची घोषणा आणि संघाच्या नवीन जर्सीचे अनावरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी स्पोर्टस् अॅथोरीटी ऑफ इंडिया (‘साई’) चे सरसंचालक संदीप प्रधान, विशाल चोरडीया, विश्व चोरडीया, शिव चोरडीया, सत्येन पटेल, सुनिल मित्तल, आशिष देसाई, सिद्धार्थ देसाई, अभय गाडगीळ, प्रशांत दत्ता, धिमन दत्ता, सुनंदन लेले, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, अतुल गायकवाड आणि सर्व खेळाडू उपस्थित होते.
कार्यक्रमा प्रसंगी बोलताना ऋतुराज म्हणाला की, मी जेव्हा २२-२३ वर्षांचा होतो तेव्हा महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धा पहावयास मी आवर्जुन जायचो आणि या स्पर्धेमध्ये खेळणे, हे माझे स्वप्न होते. परंतु काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. आज महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेमध्ये पुणेरी बाप्पा या संघाचे कर्णधारपद भुषविताना मला खुप आनंद आणि समाधान असून मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो! स्वतःवरचा आत्मविश्वास कायम ठेऊन अथक परिश्रम केल्यास निश्चितच यशाचा मार्ग सापडतो. मी आजपर्यंत जे काही क्रिकेटचे ज्ञान आत्मसात केले आहे, मला जो अनुभव मिळाला आहे, त्याचा उपयोग मी माझ्या पुणेरी बाप्पाचा संघ आणि सहकार्यांसोबत करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
पुणेरी बाप्पा संघाचे प्रतिनिधीत्व करताना आम्हाला खुप अभिमान असून गतमौसमामध्ये आम्ही खुप काही शिकलो आहे. यंदा आमची सर्वोत्तम तयारी सुरू आहे. आम्ही सर्व संघ-मालक पुणे बाप्पाच्या खेळाडूंच्या पाठीशी भक्कम उभे राहणार असून खेळाडूंना उपयुकक्त अशा सर्व योजना राबविण्यासाठी सदैव तत्पर आहोत.
-विशाला चोरडीय, सहसंघमालक, पुणेरी बाप्पा
महिला एमपीएलमध्ये (Women’s Maharashtra Premier League or WMPL 2024 )भारतीय खेळाडू, महाराष्ट्रची खेळाडू आणि डब्ल्युएमपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स संघाची कर्णधार स्मृती मानधना ही पुणेरी बाप्पाची कर्णधारपद भुषविणार आहे.