Odisha Loksabha Election 2024| देशातील लोकसभा निवडणुकींचे आतापर्यंत सहा टप्प्यात मतदान पार पडले आहे. यातील केवळ सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान येत्या 1 जून रोजी पार पडणार आहे. अनेक ठिकाणी संथपणे मतदान झाले असल्याचेही पाहायला मिळाले.
लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा ओडिशामध्ये मतदानादरम्यान बराचवेळ रांगेत उभे राहावे लागल्याने भाजप उमेदवाराने EVM मशीनची तोडफोड केल्याची घटना घडली. त्यानंतर आता ईव्हीएम मशिन तोडल्याच्या आरोपाखाली भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि उमेदवार प्रशांत जगदेव यांना अटक करण्यात आली आहे. ते पक्षाचे खुर्दा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
बोलागड ब्लॉक येथे ते मतदानासाठी गेले असताना ईव्हीएममध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे जगदेव यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. मतदान केंद्रावर त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी त्यांचा वादही झाला. या वादातूनच त्यांनी तेथे ठेवलेले ईव्हीएम मशिन ओढले आणि त्यात ते मोडले गेले.
जगदेव यांना न्यायालयीन कोठडी
जगदेव यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून सध्या ते खुर्दा येथील तुरूंगात बंद आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आणि मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याचा आरोप जगदेव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. Odisha Loksabha Election 2024|
दरम्यान, जगदेव यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले असून ते पोलीस ठाण्यातच धरणे आंदोलनाला बसले आहेत. मशिन चुकून जमीनीवर पडल्यामुळे त्याचे नुकसान झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करताना मतदान केंद्रातील सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले जावेत, अशी मागणी त्यांनी केली. तर जगदेव यांच्यावरचे आरोप राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा दावा भाजपनेही केला आहे. Odisha Loksabha Election 2024|
हेही वाचा:
खुशखबर ! येत्या पाच दिवसांत मान्सून देशात दाखल होणार ; हवामानशास्त्र विभागाने दिली माहिती