Accident News : नोएडातील एका रहिवाशाला रविवारी सकाळी एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ऑडी कारने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे.
कार चालक अपघातानंतर गाडीसह पळून गेला आहे. त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना सकाळी ६.३० च्या सुमारास घडली.
गिझोर गावाजवळ राहणाऱ्या प्रदीप नावाच्या एका व्यक्तीने आज सेक्टर २४ पोलिस स्टेशन गाठले आणि अधिकाऱ्यांना कळवले की त्याचे वडील जनक देव साह यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे.
या प्रकरणात ताबडतोब एफआयआर दाखल करण्यात आला आणि शवविच्छेदनासह कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली. वाहनाच्या ओळखीसाठी, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि इतर पोलिस पथके देखील या प्रकरणात काम करत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज मध्ये पांढऱ्या रंगाच्या ऑडीने धडक दिल्याचे दिसले. या कारचा शोध घेतला जात आहे.नोएडा येथे १६ मे रोजी झालेल्या अशाच एका घटनेत, एका नर्ससह दोघांचा मृत्यू झाला होता.