ASIAN WRESTLING OLYMPIC QUALIFIERS 2024 :- किरगिझस्तानची राजधानी बिश्केक येथे आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय कुस्ती संघाला मोठा धक्का बसला आहे, देशातील दोन सर्वोत्तम कुस्तीपटू दीपक पुनिया आणि सुजीत कलाकल हे या महत्त्वाच्या स्पर्धेला मुकणार आहेत. हे दोघेही जण या स्पर्धेसाठी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. दुबईतील खराब हवामानामुळे त्यांचे विमान बिश्केकमध्ये उशिरा पोहोचल्याने त्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संततधार पाऊस आणि पुरामुळे अडकून पडल्यानंतर पुनिया आणि कलकल दोघेही अखेरीस शुक्रवारी सकाळी बिश्केकला पोहोचण्यात यशस्वी झाले. परंतु भारतीय प्रशिक्षकांनी विनंती करूनही आयोजकांनी त्यांना उशीरा पोहचल्याने वजनमाप प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी दिली नाही. महत्वाचे म्हणजे प्रत्येक गटातील कुस्तीचा सामना सुरू होण्यापूर्वी कुस्तीपटूंसाठी वजनमाप (वजन मोजणे) अनिवार्य असते.
Officials of CGI Dubai are in touch with wrestlers, Deepak Punia and Sujeet Kalkal who have been stranded in Dubai due to the disruption of flights. They will be accommodated in a flight from Dubai to Bishkek tonight ahead of the Asian Olympic Qualifying tournament.… pic.twitter.com/UbgB4ntnTM
— SAI Media (@Media_SAI) April 18, 2024
टोकियो गेम्समध्ये पदक जिंकण्याच्या जवळ आलेले पुनिया (86 किलो), आणि सुजीत (65 किलो), आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेण्यासाठी बिश्केकला जात होते. पॅरिस ऑलिम्पिकसाठी ही महत्त्वाची पात्रता स्पर्धा आहे.
#WMLT20 : आयपीएल सारखी नवीन ‘टी-20 लीग’ लवकरच होणार सुरू, जगभरातील दिग्गज होणार सहभागी….
दुबईतील पावसामुळे उद्भवलेल्या संकटामुळे रशियन प्रशिक्षक कमल मलिकॉव्ह आणि फिजिओ शुभम गुप्ता यांच्यासमवेत या दोघांना जमिनीवर झोपावे लागले आणि त्यांना योग्य अन्न मिळू शकले नाही. ते 16 एप्रिलपासून दुबई विमानतळावर अडकले होते आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची संधी त्यांच्या हातातून निसटली आहे. त्यांना बिश्केकसाठी कोणतीही फ्लाइट मिळाली नाही. आता पॅरिससाठी पात्र ठरण्याची शेवटची संधी तुर्कीमध्ये मे महिन्यात होणारी जागतिक पात्रता असेल.