अवैध दारू विक्रीवर कारवाईचा बडगा

तीन महिन्यांत सुमारे 18 लाखांचे मद्य जप्त ः आचारसंहिता काळात कारवाईला वेग
शर्मिला पवार

पिंपरी  – लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले अन पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईला देखील वेग आला. शहरात अवैध दारु विक्री व अवैध वाहतुकीवर कारवाईचा सपाटाच राज्य उत्पादन शुल्काने लावला असून त्यानुसार जानेवारी ते मार्च 2019 या तीन महिन्यात “ई’ व “फ’ प्रभागात मिळून एकूण 17 लाख 71 हजार 887 रुपयांची दारु जप्त केली आहे. तर आचारसहिंता लागल्या पासून म्हणजे केवळ मार्च महिन्यात 6 लाख 66 हजार 10 रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे. निवडणूक काळात भरारी पथके नेमली आहेत. विहीत काळात सर्व दारु विक्रीची दुकाने बंद करण्याचेही काम सध्या सुरु आहे.

परवाना आणि नूतनीकरणातून मिळाले 12 कोटी 34 लाख

राज्य उत्पादन शुल्काला या तीन महिन्यात मद्य परवान्याचे उत्पन्नही घसघशीत मिळाले आहे. दिवसाला 5 रुपयाचा मद्य परवाना असून, वर्षाला 100 रुपये तर आजीवन मद्यपरवाना हा केवळ हजार रुपयांचा आहे. यामध्ये नागरिकांची पसंती ही आजीवन परवान्याला असून हा परवाना ऑनलाईन पद्धतीनेही होत असल्याने नागरिकांचा त्याच्याकडे कल जास्त असतो. तसेच मद्य विक्री परवाना नूतनीकरणाद्वारे देखील शहरातून राज्य उत्पादन शुल्क विभागास मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परवाना धारकांची संख्याही वाढली असून यामध्ये तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवड राज्य उत्पादन शुल्काला 12 कोटी 34 लाख 63 हजार 135 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

तीन महिन्यांचा लेखा-जोखा

जानेवारी -39 गुन्ह्यात 32 आरोपींना अटक केले असून यामध्ये 1 हजार 835 लीटर दारू जप्त केली आहे. यामहिन्यात पोलिसांनी 6 लाख 75 हजार 907 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फेब्रुवारी -महिन्यात एकूण 43 गुन्हे दाखल झाले असून 1 हजार 779 लीटर दारू जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 4 लाख 029 हजार 970 रुपयांची दारू जप्त केली आहे. मार्च महिन्यात 33 गुन्हे दाखल झाले असून 1 हजार 735 लीटर दारू जप्त करण्यात आली आहे.

शहरात देशी तसेच विदेशी मद्यही राजरोसपणे बेकायदेशीर रित्या वाहून नेले जाते किंवा त्यांची विक्री केली जाते. हे प्रमाण निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वाढते. कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी राजकीय नेते व त्यांचे सहकारी हे काम छुप्या पद्धतीने मात्र मोठ्या प्रमाणत करतात. त्यांच्यावर चाप बसावा म्हणून शहरात विविध ठिकाणी नाकेबंदी, तसेच फिरते पथक याद्वारे कारवाई केली जात आहे. या तीन महिन्यात 115 गुन्हे दाखल झाले असून राज्य उत्पाजन शुल्काच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 96 आरोपींना अटक करत त्यांच्याजवळून दहा गाड्या जप्त केल्या आहेत.

तीन महिन्याच्या कारवाईत पथकाने 5 हजार 349 लिटर दारू जप्त केली आहे तर एकूण 31 हजार 550 लिटर रसायन नष्ट केले आहे. तर एचार सहिंतेच्या काळात एका महिन्यात 1 हजार 735 लीटर जारु जप्त केली आहे. यामध्ये पुणे जिल्हा पातळीवरचे व पिंपरी-चिंचवड येथील अशी दोन पथके काम करतात. पुणे जिल्हा पथकाने मार्च महिन्या 11 लाखांची बनावट दारु पिंपळे सौदागर येथून जप्त केली होती.

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर रात्री “इ’ व “फ’ विभागाची दोन पथके ही फिरतीवर असून त्यामध्ये सुमारे आठ-आठ अधिकाऱ्यांचे पथक गस्त घालत आहे. विहीत वेळेत दारुची दुकाने व विक्री बंद केली जात आहेत ना, याची पाहणी केली जात आहे. अवैध रित्या दारु विक्री, वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. यामध्ये मावळ व पिंपरी-चिंचवड शहर परिसराचा समावेश आहे.

– राजेंद्र शेवाळे, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, पिंपरी-चिंचवड

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.