टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे चर्चेत असली तरी यावेळी तिने दिलेल्या एका वक्तव्यामुळे ती वादात सापडली आहे. श्वेताने पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अभिनेत्रीच्या वादग्रस्त वक्तव्यावर कठोर भूमिका घेत हे खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले.
Actress Shweta Tiwari made a controversial statement on God.. It happens in the press conference of #ShowStopper Webseries..#ShwetaTiwari @rohitroy500@DiganganaS #ControversialStatement #Trending #TrendingNow #ottplatform pic.twitter.com/EqmsibDoy4
— Deep Singh (@Deepsingh_page3) January 26, 2022
श्वेता तिच्या आगामी वेब सीरिजच्या घोषणेसाठी आदल्या दिवशी भोपाळला पोहोचली होती. श्वेता तिच्या टीमसोबत पत्रकार परिषदेत आली होती. यावेळी अभिनेत्रीने माध्यमांशी बोलताना आक्षेपार्ह विधान केले. श्वेता तिवारी म्हणाली, ‘देव माझ्या ब्राचा आकार घेत आहे.’ त्याचवेळी तिच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
एका वेब सीरिजच्या प्रमोशनशी संबंधित एका कार्यक्रमात श्वेताने सांगितले की, देव ब्राचा आकार घेत आहे. अभिनेत्रीने हे मजेशीरपणे सांगितले, मात्र त्यावरून गदारोळ झाला आहे. गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळचे आयुक्त मकरंद देउस्कर यांना 24 तासांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, श्वेता तिवारी यांचे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. भोपाळ पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करून 24 तासांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.