मुंबई – लाखो दिलांची धडकन आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असणारी बॉलिवूड अभिनेत्री ‘मौनी रॉय’ तिच्या बॉयफ्रेंड ‘सूरज नाम्बियार’सोबत आज (दि. 27) विवाह बंधनात अडकली आहे. गोव्यात मौनी रॉय आणि सूरज नाम्बियारचं डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं असून, या शाही विवाह सोहळ्यासाठी मोजक्या पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आलं होत. मात्र, करोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर लवकरच ही जोडी मुंबईत एक ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहेत.
View this post on Instagram
सोशल मीडियावर या विवाह सोहळ्याचे फोटो समोर आले असून अल्पावधीत हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. मौनी-सूरज यांच्या फोटोंवर सध्या लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव होत असून, सर्वांनीच या जोडीला शुभेच्छा दिल्या आहे. सूरजचा जन्म कर्नाटकमधील बंगळूरूमध्ये झाला. तो दुबईमधील प्रसिद्ध बँकर आणि बिझनेसमॅन आहे.
View this post on Instagram
सूरजनं जैन इंटरनॅशनल रेजिडेंशियल स्कूलमधून शिक्षण घेतले. 2008 मध्ये त्याने बंगळूरूमधील आरवी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये सिव्हिल इंजीनियरिंगच्या कोर्ससाठी अॅडमिशन घेतले होते. सूरजला ट्रॅव्हल करायला आवडते. सूरजचा भाऊ नीरज नांबियार हा पुण्यामधील इव्हेंच मॅनेजमेंच कंपनीचा को-फाऊंडर आहे.