मुंबई – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोमुळे घरा घरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे मुनमुन दत्ता अर्थात सर्वांची लाडकी बबिता मीडियावर चिडल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मुनमुन आपल्या स्पष्ट वक्तेपनासाठी ओळखली जाते. प्रसिद्धीत राहण्यासाठी ती कधी विनाकारण टिपण्णी किंवा स्टंटबाजी करत नाही. परंतु नुकतेच तिने पाठीमागून कॉमेंट करणाऱ्या काही फोटोग्राफर्स विरोधात आपली नाराजी व्यक्त केली.
एका ब्रँडच्या कार्यक्रमादरम्यान मुनमुनने मीडियाशी संवाद साधला. यावेळी अनेक फोटो ग्राफर्स फोटो काढताना नको ती बडबड आणि वाईट कमेंट करत असल्याचे मुनमुनने यावेळी म्हंटले. ज्यावेळी फोटो ग्राफर्स फोटो काढत असतात त्यावेळी ते काय बोलतात ते ऐकू येत नाही परंतु ज्यावेळी ते व्हिडीओ एडिट करतात त्यावेळी त्यांनी केलेल्या कमेंट स्पष्टपणे ऐकू येते ज्या खूप वाईट असतात अशा लोकांची एक कम्युनिटीचं झाली असल्याचे देखील मुनमुन यांनी यावेळी म्हंटले.
View this post on Instagram
मुनमुनने साकारलेले बबिता हे पात्र प्रेक्षकांना आजही प्रचंड आवडत म्हणूनच अनेक चाहत्यांनी मुनमुनच्या मताशी सहमती दर्शवली आहे. अनेकांनी तिच्या व्हिडीओखाली कमेंट करत सहमती दर्शवली आहे. मुनमुन तारक मेहतामध्ये काम करत असली तरी अनेक छोट्या मोठ्या ब्रॅण्डला प्रमोट करताना दिसून येते. बबिता हा टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे.