मुंबई – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा कॉमेडी शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या सिरियलमधील सर्वच पात्र प्रेक्षकांना नेहमीच हसवतात. आजही ही सर्व पात्र खूप प्रसिद्ध आहेत. विशेष करून चाहत्यांना अय्यर-बबिता आणि जेठालाल यांची केमेस्ट्री पाहताना खूपच मजा येते. खऱ्या आयुष्यात देखील अय्यरची होणारी पत्नी बबितापेक्षाही जास्त सुंदर असल्याच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘अय्यर’ची भूमिका करणारा तनुज महाशब्दे खऱ्या आयुष्यात कोणालातरी डेट करत आहे. लवकरच तो त्या मुलीशी लग्न करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. अय्यर सध्या सिंगल असून वयाच्या ४२ व्या वर्षी बोहल्यावर चढण्यासाठी तयार असल्यामुळे चाहत्यांना देखील मोठी उत्सुकता लागली आहे.
सोशल मीडियावर देखील आता याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. अय्यरची पत्नी नेमकी कोण आहे हे अद्याप समजू शकलेले नाही तरीही चाहते आपले तर्क वितर्क लावत आहेत. अय्यर अर्थात तनुज महाशब्दे नेमकं कधी लग्न करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चाहते त्यांना सोशल मिडीआयवर याबाबत प्रश्न विचारत आहेत.