राजगुरुनगर – राज्यभरातील शासकीय दवाखान्यातून प्रसूती होणाऱ्या महिलांसाठी “बेबी केअर किट’ बॅग्ज तालुक्यांच्या महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयात (आयसीडीएस) धूळ खात पडून आहे. या बेबी केअर किट वाटपाबाबत तत्कालीन युती शासनाने स्पष्ट निर्देश न दिल्याने ही योजनेच्या वाटपाबाबत तालुकापातळीवर संभ्रमवस्थाचे वातावरण सध्या तरी दिसत असल्याने जवळपास महिनाभरापासून हे केअर किट धूळ खात पडून असल्याचे समोर आले आहे.
राज्यात अंगणवाड्यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये आदी शासकीय दवाखान्यातून ज्या महिला प्रसूत होतील. व दोन महिन्यांपर्यंतच्या नवजात बाळांसाठी असेल अशा महिला लाभार्थीना बेबी केअर किट वाटप करण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश असले तरी नेमक्या कोणत्या महिन्याच्या तारखेपासून किटचे वाटप करायचे हे स्पष्ट निर्देश नसल्याने गोंधळ उडाला आहे.
खेड तालुक्यात अंगणवाड्यांचे दोन विभाग आहे. आयसीडीएस विभाग राजगुरूनगर क्रंमाक एकसाठी 269 तर आयसीडीएस (चाकण) राजगुरूनगर क्रमांक दोनसाठी 317 असे मिळून 686 बेबी केअर किट शुक्रवारी (दि. 7) पुरवठादाराने पुरवठा केला आहे. तालुक्यात 10 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तीन ग्रामीण रुग्णालये आहेत. या शासकीय दवाखान्यातून बाळंतपणाची आकडेवारी मिळाली तरच हे वाटपाचे सुसुत्रीकरण जुळणार आहे.
“शोधा म्हणजे सापडेल’ म्हणण्याची वेळ
ज्या शासकीय दवाखान्यात गर्भवतींची नाव नोंदणी केलेल्या व त्याच ठिकाणी पहिल्या प्रस्रूती असणाऱ्या महिलांच्या नवजात बालंकासाठी (मुलगी किंवा मुलगा) हे बेबी केअर किट उपलब्ध करून द्यावेत.गर्भवती 9 महिन्यांपासून प्रथम प्रसुतीच्या 2 महिन्यांच्या आतील कालावधीतील पात्र ठरणाऱ्या महिलांनाच याचा लाभ दिला जाणार असला तरी महिला व बाल विकास विभागाचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी दि. 6 जानेवारी 2020 रोजी काढण्यात आलेल्या बेबी केअर किट वाटपाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या परीपत्रक जारी केले आहे मात्र, स्पष्ट
निर्देशाचे अवलोकन कसे करावे या चक्रव्यहात बाल विकास प्रकल्प अधिकारी संभ्रमावस्थेत आहेत.
तर दि.29 डिसेंबर 2018 अन्वये तसेच पुरवठा आदेश नमुद सुचनानुसार म्हटंले गेले आहे. मात्र, 2018 चा आदेश काय आणि सूचना काय याचे परिपत्रक तर सापडले पाहिजेना. शोधा म्हणजे सापडेल, असे म्हणण्याची वेळ वरिष्ठांवर आली आहे. याच परिपत्रकात अजून एक घोळ घालून ठेवल्याचे दिसून येत आहे.
योजना डब्यात जाणार?
ज्या लाभार्थी महिलांची नोंदणी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयात केलेली नसेल; परंतु अंगणवाडी केंद्रात नाव नोंदणी केली असेल तर अंगणवाडी सेविकेमार्फत आरोग्य विभागाच्या सहाय्याने शासकीय दवाखान्यात नाव नोंदणी करुन लाभार्थीना बेबी केअर किट वाटप करुन अंगणवाडी स्तरावर त्याची नोंद ठेवावी. मुळात खोकल्यापेक्षा ईलाज भंयकर अशी अवस्था झाल्याचे पहावयास मिळते.
ऐवढे उद्योग करण्यापेक्षा बालविकास प्रकल्पांना वेठीस धरण्यापेक्षा सरळ शासकीय रुग्णालयामार्फत “बेबी केअर किटचे वाटप’ करणे हाच रामबाण उपाय असल्याचे मत आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. युतीची सत्ता जाऊन आता महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्याने ही योजना डब्यात जाणार का निविदांनुसार बेबी केअर किटचा पुरवठा होणार हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
कत्रांट केले रद्द?
बेबी केअर किटची किंमत 1995.63 रुपये इतकी आहे. हे किट उपलब्ध करुन देण्यासाठी 13 ऑगस्ट 2019 ला ई-निविदा प्रकाशित करण्यात आली. तांत्रिक निविदा 4 सप्टेंबर 2019 तर वाण्यजिक निविदा 9 सप्टेंबर 2019 ला खुली करण्यात आली यावरुन महिला व बाल विकास खात्याने या सर्व बांबीची मुल्यांकनाला कमीत कमी 15 दिवस तरी लागताना अवघ्या चार दिवसांत तांत्रिक मुंल्याकंन केल्याचे समोर आले.
विशेष म्हणजे वाणिज्यिक निविदा उघडल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत खरेदी समिती, नियोजन आणि वित्त विभागाकडून मान्यताही घेतल्याचे समोर आले आहे. या निवेदेनुसार 2019-20 मध्ये 40 लाख 875 एवढे बेबी केअर किटचे 79 कोटी 99 लाख 98 हजार 176 रुपयांत इंडो अलाईड प्रोटीन फुडस, दादर मुबंई यांना पुरवण्याचे कंत्राट मिळाले. ज्या गतीने 13 सप्टेंबर 2019 ला अध्यादेश काढला याच दिवशी पुरवठा करण्याचे आदेश काढण्यात आला असताना पुरवठादाराने 60 दिवसांत म्हणजेच 26 डिसेंबर 2019 पर्यंत किट पुरवणे आवश्यक असताना एकही किटचे वितरण केले नसल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत शासनदरबारी तक्रार आल्यानंतर या निविदेचे कत्रांट रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे.