कराची –पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याने भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याला मागे टाकत एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने सर्वात कमी डावात एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात 4 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
पाकिस्तान सध्या मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेत त्यांचा कर्णधार आझम चांगलाच भरात आहे. आझम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 4 हजार धावा करणारा जागतिक क्रिकेटमधील दुसरा खेळाडू ठरला आहे.
त्याने 82 डावांत ही कामगिरी केली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाने 81 डावांमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. कोहलीने 93 डावांत हा पल्ला पार केला होता.