जालना : जालन्यातील परतुरचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील सेवली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र लोणीकरांनी त्यांच्यावर होत असलेला आरोप फेटाळला आहे.
दरम्यान “मी पैसे वाटप केले आहे, त्यामुळे कमळ लिडवर आहे. म्हणून मला निवडणुकीची बहिरी वाटत नाही”. अस बोलतानाचा एका व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोणीकर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बबनराव लोणीकरांची पैसेवाटप केल्याची कबुली; राष्ट्रवादीची टीका
याबाबत खुलासा करताना लोणीकर म्हणाले की,’ मी माझ्या भाषणात पैसे दिल्याचा जो उल्लेख आहे, तो मी विकास कामांसाठी जे पैसे दिलेत त्यासंबंधीचा आहे.’ त्यामुळे या आरोपात काही तथ्य नाही. कारण ग्रामीण भागामध्ये निधी दिला अशा शब्दप्रयोग करण्याऐवजी पैसे दिले असं बोललं जात.
त्यामुळे मी त्या ६५ तांड्यांसाठी जो निधी दिला आहे त्याचीमाहिती मी लोकांना देत होतो. असं लोणीकरांनी स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी सेवली पोलीस अधिक तपास करत आहेत.