मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांची मुंबईत रिझर्व्ह बॅंकेपुढे निदर्शने सुरू असताना त्यातील दोन ज्येष्ठ नागरिक बेशुध्द पडले. त्यांना पोलिसांनी सावरले तर अन्य ठेविदारांनी त्यांना वैद्यकीय उपचार दिले.
रिझर्व्ह्र बॅंकेच्या मुंबईतील कार्यालयापुढे घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या पीएमसी बॅंकेच्या ठेवीदारांनी शनिवारी निदर्शने केली. हे ठेवीदार दुपारी पावणे बाराच्या सुमारास जमा झाले. त्यांनी पीएमसी आणि रिझर्व्ह बॅंकेच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रनाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतले नाही अथवा गुन्हा नोंदवला नाही,असे पोलिसांनी सांगितले.
पीएमसी बॅंकेत कथित 4हजार 355 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यातून आता 40 हजार रुपये काढता येतात. मात्र सर्व ठेवी परत मिळाव्यात अशी ठेवीदारांची मागणी आहे. त्यासाठी मुंबईत जोरदार निदर्शने सुरू आहेत.