नवी दिल्ली/पुणे – योगीराज भाऊमहाराज परांडे यांना बाबा आमटे शांती भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा राजधानी दिल्ली येथील, इंडिया इस्लामिक कल्चरल आॅडिटोरिअम लोधी रोड, येथे संपन्न झाला. दत्त संप्रादाय व वारकरी संप्रादायाच्या समन्वयातुन समाजसेवा, समाजप्रबोधन, अंधश्रध्दानिर्मुलन, व्यसनमुक्ती व वारकरी संप्रादयाचा प्रसाराचे काम योगीराज भाऊमहाराज परांडे करत आहेत.
भारतीय सामाजिक पर्यटन विकास परिषद व आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ व न्यु जर्नी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाबा आमटे शांती भुषण पुरस्कार वितरण व नॅशनल बलिदान अवार्ड २०२३ चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाम जाजु (भाजप नेते) यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले . त्यांच्यासोबतच नागपुर विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. एन.पठाण , संजय कुमार सैन (पोलिस उपायुक्त दरियागंज दिल्ली), धरमपाल भारव्दाज (चिफ फायर आॅफिसर दिल्ली ) व सैन्यदलातील अनेक माजी अधिकारी उपस्थित होते.
पुरस्कार वितरणापुर्वी भाऊमहाराज परांडे यांच्या हस्ते दिप प्रज्वल करण्यात आले. आंतरभारती शिक्षण संस्थेचे उमाजी भिषण यांनी, भाऊमहाराज परांडे यांनी दत्तसेवेच्या माध्यमातुन व्यसनमुक्ती व समाजप्रबोधन व जनसामान्यांना सुलभ व सोप्या मार्गाने अध्यात्म मार्गदर्शनाच्या कार्याचा गौरव केला .पुण्यात २५,००० हुन अधिक अनुयायी भाऊंच्या मार्गदर्शनाखी वारकरी संप्रदाय व दत्तसंप्रादायाच्या सेवेत आहेत व महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर भाऊंचे अनुयायी आहेत याचे कौतुक केले .पुण्यातील वारकरी संप्रदायात भाऊमहाराज परांडे यांना हा पुरस्कार मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे