मुंबई – ‘डॉक्टर जी’ या चित्रपटामुळे अभिनेता आयुष्मान खुराना सध्या चांगलाच चर्चेत आहे. रकुलप्रीत सिंग आणि शेफाली शाहसोबत आयुष्मानला पाहून चाहते चांगलेच खुश झालेत. आयुष्मानने अभिनेता कार्तिक आर्यनसोबतचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचा हटके अंदाज पाहायला मिळतोय. घरी पार्टी झाल्यानंतर हा व्हिडीओ शूट केल्याचे समजते.
आयुष्मानच्या घरी झालेल्या दिवाळी पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत आहेत.या व्हिडिओमध्ये कार्तिक आणि आयुष्मान दोघेही खूप असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये आयुष्मान पैशांचा बंडल दाखवून म्हणतो, ‘कार्तिकने इथल्या दिवाळी पार्टीत इतके पैसे जिंकले आहेत, बॉक्स ऑफिसवर नाही. यानंतर आयुष्मान म्हणतो की कोणत्या पिक्चरला इतके पैसे मिळावेत, तर कार्तिक आर्यन यावर म्हणतो की, मला वाटते की ‘डॉक्टर जी’ला हे पैसे मिळाले पाहिजेत.यानंतर दोघेही सर्वांना ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट पाहण्यासासाठीची विनंती करतात. हा व्हिडीओ शेअर करताना आयुष्मानने कॅप्शनमध्ये लिहिले की, “या माणसाला वाटते की डॉक्टर जीला बॉक्स ऑफिसवर पैसे मिळावेत.” यासोबतच आयुष्मान हार्ट इमोजी देखील पोस्ट करतो.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये दोन्ही कलाकारांना एकत्र पाहिल्यानंतर दोघांचे चाहते खूप खूश आहेत. आयुष्मानच्या या व्हिडिओवर चाहते कमेंट करत आहेत आणि दोघांना स्क्रिनवर एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. तर अनेकांनी कमेंट करत चित्रपट मस्त असल्याचे म्हंटले आहे.