सामाजिक विषयांवर बनवलेल्या चित्रपटांमध्ये मुख्यतः दिसणारा आयुष्मान खुराना पुन्हा एकदा चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता या वर्षी त्याच्या तीन प्रमुख चित्रपटांसह मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
आयुष्मान खुराना लवकरच आर्टिकल 15 चे दिग्दर्शक अनुभव सिन्हा सोबत ‘अनेक’ या सोशल ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल आपले विचार शेअर करताना अभिनेता म्हणाला की, हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा प्रकल्प आहे आणि हा एक दमदार चित्रपट आहे कारण तो प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करेल.
यानंतर अभिनेता अनुभूती कश्यपच्या डॉक्टर जी हा चित्रपट येणार आहे. यामध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आयुष्मान सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. माझा पुढचा चित्रपट डॉक्टर जी हा एक असा विषय आहे जो लोकांना एका महत्वाच्या सामाजिक समस्येवर मनोरंजक मार्गाने विचार करायला लावेल. असे डॉक्टर जी या चित्रपटाबाबत सांगताना अभिनेता आयुष्मान म्हणाला आहे.
यानंतर आयुष्मान आनंद एल रायच्या चित्रपटामध्ये अॅक्शन हिरोची भूमिका साकारणार आहे. सोबतच हार्डकोर मसाला एंन्टरटेनरमध्ये अभिनेता पाऊल ठेवणार आहे. अॅक्शन चित्रपटांमध्ये एंट्री करण्याबाबत आयुष्मान म्हणाला की, मला या शैलीतील चित्रपटात काम करणे आवडते आणि मला आशा आहे की या चित्रपटाद्वारे आपण लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करू शकू.
आयुष्मान शेवटचा 2021 च्या चंदिगड करे आशिकीमध्ये वाणी कपूरसोबत दिसला होता. या चित्रपटाने LGBTQ समुदायाला आदरणीय रीतीने समोर आणले, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हवीतशी कमाई करू शकला नाही.