मुंबई – ‘ड्रीम गर्ल 2’ मधून नुसरत भरुचाची जागी अनन्या पांडेला घेण्यात आले, यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. स्वःताह नुसरतनेही अनन्या पांडेला चित्रपटातून काढून टाकल्यानंतर तिला साईन केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नुसरत भरुचाने माध्यमांशी बोलतांना सांगितले होते की तिला ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये बदलण्याचे कोणतेही तर्क समजले नाही. पण आता आयुष्मान खुरानाने असे का केले ते सांगितले आहे.
आयुष्मान खुराना ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये पुन्हा एकदा पूजाच्या भूमिकेत परतला आहे. त्याच्याशिवाय, या चित्रपटात अन्नू कपूर, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी आणि विजय राज यांच्याही भूमिका आहेत, जे पहिल्या भागाचा भाग होते. याशिवाय परेश रावल, राजपाल यादव, मनोज जोशी, असरानी आणि सीमा पाहवाही आहेत. यावेळी नुसरत भरुचा या चित्रपटाचा भाग नाही.
‘ड्रीम गर्ल 2’ मधून नुसरत भरुचाच्या बदलीबद्दल आयुष्मान खुराना माध्यमांशी बोलतांना म्हणाला, ‘हे एक ऑर्गैनिक डेवलेपमेंट आहे. चित्रपटाची कथा अगदी ताजी आहे, त्यामुळे त्यासाठी एका नव्या चेहऱ्याची गरज होती. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. आता ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये आयुष्मानच्या विरुद्ध अनन्या पांडे दिसणार आहे. अभिनेत्याने त्याचे कौतुक केले आणि सांगितले की तिने एक अद्भुत काम केले आहे. अनन्या पांडेनेही खूप मेहनत घेतली. आयुष्मान खुरानाच्या म्हणण्यानुसार, त्याला अनन्यासोबत काम करायला खूप मजा आली.